आपला विदर्भ

नागरिकांनी आरोग्य शिबिराचे लाभ घ्यावं… जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे प्रतिपादन


विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क


✍️जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने पंचायत समिति अहेरी अंतर्गत गुड्डीगुड्म येतील शासकीय आश्रम शाळेच्या पटांगणात तालुका आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते,याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलतांना म्हणाले जिल्हा परिषदेच १३वा वने योजनेतून जिल्हातील १२ ही तालुक्यात सदर शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
आज या परिसरातील गुड्डडीगुडम हे गाव मध्यवर्ती ठिकाण असून शासकीय आश्रम शाळा असल्याने विद्यार्थी व परिसरातील जास्तीजास्त महिला,पुरुष,लहान बालकांचे आरोग्य तपासणी करण्यासाठी तज्ञ वैद्यकिय अधिकारी शिबिरात तपासणी करून उपचार करणार असून तपासणी व औषध उपचार मोफत आहे.त्यामुळे सर्व नागरिकांनी सदर शिबिराच्या पुरेपूर लाभ घ्यावे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाच्या विशेष अतिथि म्हणून अहेरी पंचायत समितिचे सभापती श्री.भास्कर तलांडे,तिमरमचे सरपंच श्री.महेश मडावी,होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण वानखेडे,डॉ.राकेश गावतूरे,डॉ.अभिलाषा बेहरे,डॉ.उषा दुर्गम,डॉ.सत्यनारायण दुर्गम,डॉ.दिपक जोगदंड डॉ.पवन ऊइके,डॉ.राजेश मानकर,मुख्याध्यापक श्री.शिवनकर,आदि मंचावर उपस्थित होते.
प्रस्ताविक डॉ.वानखेडे,यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.मानकर यांनी केली.
यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी शाळेतील शिक्षक विध्यार्थी व नागरिक बहुसंख्यानी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *