आपला विदर्भ

बालिका विद्यालयाकडून जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या सपत्नीक सत्कार

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय कडून नवनिर्वाचित जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडाल वार,प.स.माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार सप्त्नीक सत्कार…!
✍️इंदाराम येतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आज वार्षिक स्नेह संमेलन व पालक सभा आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार व त्यांची अर्धांगीनी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांच्या सप्त्नीक शाल व श्रीपाळ देवून सत्कार करण्यात आले आहे.
उप गटशिक्षणधिकारी श्री.एम.एन.चलाख,शाळेची मुख्याध्यापिका कु.डी.वाय ढवस,श्री.एस.एन.कावळे,एस.एन.बंड,आदि शिक्षक व शिक्षिका मिळून सामूहिकपणे सत्कार केले.
सत्कार करतेवेळी अहेरीचे तहसीलदार श्री.ओम्कर ओतारी,पोलीस निरीक्षक श्री.डांगे साहेब,जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे,इंदारामचे सरपंच श्री.गुलाबराव सोयाम,उपसरपंच श्री.वैभव कंकडालवार आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *