आपला विदर्भ

जिल्हास्तरीय बाल क्रिडा व सांस्कृतिक संमेलनाचे समारोप व बक्षीस वितरण

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क *जिल्हास्तरीय बाल क्रिडा व सांस्कृतिक सम्मेलनाच्या समारोपिय व बक्षीस वितरण कार्यक्रम **
✍️जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हा स्तरीय बाल क्रीड़ा,अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी यांचे क्रीडा व कला स्पर्धा दिनांक 5 फेब्रूवारी ते 8 फेब्रूवारी 2020 पर्यत क्रीडा संकुल आल्लापल्ली येथे पार पडले . यात गडचिरोली जिल्हाचे बाराही तालुक्याचे विद्यार्थी खेळाडु, पदाधिकारी अधिकारी व शिक्षकांच्या चमु समाविष्ट झाल्यात. या स्पर्धेत कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट,रिले, वैयक्तिक सामने,सांकृतिक कार्यक्रमात वैयक्तिक नृत्य, समुहगीत,नक्कल/नाटिका, समुहनृत्य इत्यादी विविध स्पर्धा मुले व मुली प्राथमिक, माध्यमिक गटात व पुरूष व महिला ( कर्मचारी पदाधिकारी ) गटात घेण्यात आले होते.
आज समारोपिय व बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आले होते.या कार्यक्रमाचे बक्षीस वितरक म्हणून जिल्हाचे जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार होते तर समारंभ अध्यक्ष म्हणून जि.प.उपाध्यक्ष श्री.मनोहर पाटील पोरेटी,विशेष अतिथि म्हणून अहेरीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,गडचिरोलीचे सभापती श्री.मारोती इचोडकर,अहेरीचे उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,प.स.सदस्य श्री.राकेश तलांडे,नेताजी गावतूरे,आलापलीचे सरपंच सौ.सुंंगधा मडावी,नागेपलीचे सरपंच सौ.सरोज किशोर दुर्गे, शिक्षणाधिकारी श्री.मूनघाठें , साहेब,अशोक येलमूले,आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या करीता सर्व खेळाडू मुले मूली, सर्व शिक्षक शिक्षिका खेळाडू ,स्पर्धक, सर्व केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक संघ पदाधिकारी यांचे सहकार्य महत्वाचे ठरले🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *