आपला विदर्भ

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीसाठी सिरोंचा येथे विदर्भवाद्यांचे चक्काजाम आंदोलन

सिरोंचा येथे विदर्भ आंदोलन समितीकडून चक्काजाम व धरणे,आंदोलन
*विविध मागण्या करून विदर्भ वेगळा करण्याचा मागणी.
*आंदोलनात अनेकानी घेतले सहभाग.
*विदर्भ वाद्यांना अटक व सुटका.
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा…

विदर्भ वेगळा झालाच पाहिजे,,असे नारे देत आज दि 10फेब्रुवारी रोजी सकाळी सिरोंचा येथे शेकडो विदर्भवाद्यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम व धरणे आंदोलन केले आहे.
महाराष्ट्र राज्यातून विदर्भ वेगळा झाल्याशिवाय विदर्भचा विकास होणार नाही.गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भाची मागणी होत असताना सुध्दा कोणत्याही सरकार विदर्भ देण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. पाणी,वीज,खनिज विदर्भात विपुल प्रमाणात असताना सुध्दा विदर्भात मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रपेक्षा वीज दर जास्त आहे. अखंड महाराष्ट्रात विदर्भचा नुकसान होत असून विदर्भातील युवकांना नोकरी पासून वंचित राहावे लागत आहे. असे अनेक कारण आहेत,विदर्भ मागे पडण्यासाठी विदर्भाची विकास साधायचा असेल तर विदर्भासाठी रस्त्यावर उतरावे लागेल,तेव्हाच आपण विदर्भ सध्या करू असे म्हणत आज सिरोंचा येथील नगरम चौक जवळ चाक्का जाम व धरणे आंदोलन केले आहेत.
या चाक्का जाममुळे अहेरी,असरअ ल्ली,कलेश्वर तेलंगणा कडे जाण्याचा मार्ग काही काळासाठी बंद होती आणि काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.अनेक विदर्भवाद्यांनी रस्त्यावर येऊन विदर्भ वेगळा झालाच पाहिजे असे नाते देत विदर्भ वेगळा करण्याची मागणी केली आहे.
चाक्का जाममुळे वाहतूक ठप्प होत असल्याची पाहून पोलीस निरीक्षक अहिरकर व सिरोंचा पोलीस कर्मचाऱ्यांनी समयसूचकतेने विदर्भ वाद्यांना अटक करून पोलीस स्टेशन नेले.आणि वाहतूक सुरळीत केले.अटक केलेल्या विदर्भ वाद्यांमध्ये रामभाऊ कोमरा,किरण संगेम,नागेश ताडबोईना,वेंकटेश येल्लाला,दीपक दुर्गे,समय्या सुन्नर,राजांना मारगोनी रुपेश संगेम,सोमेश डोंगरी,राजू कॉन्द्रा, सागर मुलकला, शकुर राणा हरीश सॅनिगरपू सह अनेक विदर्भ वाद्यावर गुन्हा दाखल करून अटक व सुटका करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *