आपला विदर्भ

मेडिगड्डा कालेश्वर सिंचन प्रकल्पाचे बॅक वॉटरमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या.. जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क गडचिरोली

अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना आदिवासी विद्यार्थी संघाचे निवेदन सादर

गडचिरोली मेडिगड्डा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या बॅक वाटरमुळे सिरोंचा तालुक्यातील रब्बी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.मेडिगड्डा-कलेश्वर सिंचन प्रकल्प बाधित गावांना प्रकल्पग्रस्त गावे घोषित करण्यात यावी.अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून काल गडचिरोली येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांच्या नेतृत्वात आविस पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री कुळमेथे यांना भेटून सविस्तर चर्चा करून चर्चेअंती त्यांना निवेदन देण्यात आली आहे.

सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली गावाजवळ गोदावरी नदीवर तेलंगणा सरकार कडून मेडीगड्डा-कलेश्वर सिंचन प्रकल्प बांधण्यात आलेल्या आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पूर्व सूचना न देता मेडिगड्डा प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्याने गोदावरी-प्राणहिता नदया बारा महिने वाहत असल्याने पाण्याचे साठवणूक जास्त प्रमाणात होत असल्याने प्रकल्पाचे पाणी वर जाऊन या बॅक वाटर पाण्यामुळे हाताशी आलेल्या नदीकाठावरील शेकडो हेक्टर शेतजमिनीतील उभे पिके पाण्याखाली आल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
हातातोंडाशी आलेल्या उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची पाळी येण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.मेडिगड्डा कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या बॅक वाटरमुळे नुकसान झालेल्या शेतीचे सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.10 फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे सिरोंचा सह ग्रामीण भागातील रब्बी पिके सह मिरची,कापूस,धान, मका,आणि गोबी सह सम्पूर्ण भाजीपाला/धान्य पिकाची नुकसान झालेले आहे.सरकारने नुकसान ग्रस्त भागाची त्वरित पाहणी करून पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे गडचिरोलीचे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधाकर कूळमेथे यांना दिलेल्या निवेदनातून आविस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
येत्या दहा दिवसांचा आत प्रकल्प बाधित शेतकरी व अवकाळी पावसाने रब्बी पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार व तेलंगण सरकारकडून योग्य नुकसान भरपाई न मिळाल्यास आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ प्रांत शाखा सिरोंचाच्या वतीने सरकार विरुद्ध तीव्र आंदोलन छेडणार असल्याची इशारा निवेदनातून दिली आहे.
अतिरिक्त जिल्हाधिकारी कूळमेथे यांना निवेदन देतांना जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार यांच्या सोबत आविसचे सरसेनापती नंदूभाऊ नरोटे,युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कुणाल पेंदोरकर,आविसचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,आविस सल्लगार रवीभाऊ सल्लम,साई मंदा आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *