आपला विदर्भ

मेडपल्ली येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

*जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांचे मेडपल्ली गावकाऱ्यांकडून सत्कार.

गडचिरोली
पेरमिली येथून जवळच असलेल्या मेडपल्ली येथे जय गोंडवाना क्लब मेडपल्ली द्वारा भव्य ग्रामीण व्हॅलीबाल स्पर्धा आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार दिपकदादा आत्राम याचे हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार हे होते.प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.प.पेरमिलीचे सरपंच प्रमोद आत्राम,उप सरपंच सजान गावडे,मेडपल्लीचे माजी सरपंच सतीश वेलादी,श्रीकांत बंडामवार,असिफ खान,श्रीकांत दुर्गे,डॉ.दुर्गे,सुकेश कुंभारे,तुकाराम वेलादी आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागात शेतीचे काम संपल्यावर ग्रामस्थांना मनोरंजन म्हणून गावामध्ये खेळ घ्यावे लागतात. आणि ग्रामीण भागातील खेळाळू आपल्या कलागुणांना वाव मिळावे म्हणून आम्ही स्वतः बक्षीस देऊन प्रोत्साहन करीत आहो असे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी या प्रसंगी बोलत होते.तसेच व्हॅलीबाल स्पर्धा आयोजनाच्या मेडपल्ली गावकाऱ्यांकडून नावनिर्वचित जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले आहे. सत्कार स्वीकारताना मेडपल्ली ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये विकासासाठी कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. आणि नालीबांधकाम,विहीर,घरकुल,बोडी, शेततळे,काटेरी कुंपण,सीसी रोड यासाठी निधी खेचून आणून विकासकामे कारु असे कांकडलवार यांनी आश्वासन दिले व विकास कामे करण्यासाठी काठिबद्ध आहो अशी ग्वाही दिले.
या कार्यक्रमाला मेडपल्ली परिसरातील आविसचे पदाधिकारी व कार्यकर्तेसह गावकरी,बचत गट महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश वेलादी तर आभार प्रदर्शन श्रीकांत दुर्गे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *