आपला विदर्भ

समाजाच्या उन्नतीसाठी समाज प्रबोधन कार्यक्रम गरजेचे….भास्कर भाऊ तलांडे

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
◼️प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांचे प्रतिपादन,
🔸राजाराम:- आजची जीवन जगण्याची पध्दत हि धावपळीचे झाले असून मानवी गरजा वाढले असून अन्न,वस्त्र,निवारा असे मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या धावपळीत मानवी जीवन व्यस्त झाले असून समाजाच्या हिताचे विचार करणारे फारच कमी संख्येने असून स्वतःच स्वार्थ साधण्यासाठी धावपळ करत आहेत.
मात्र समाजाच्या दुर्लभ कुटुंबाकडे लक्ष देण्यास आज कुणाकडे वेळ नाही त्यामुळे गोरगरीब कुटुंबाला त्रास सोसावे लागत आहे.समाजाच्या हितासाठी समाज प्रबोधन कार्यक्रम घेणे अत्यंत गरजेचे असून अश्या समाज प्रबोधनतून समाजाचे समस्याचे आदानप्रदान होत असल्याच्या प्रतिपादन अहेरी पंचायत समिती सभापती श्री.भास्कर तलांडे यांनी केली.
वैदर्भिय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघाकडून राजाराम येते प्रभु विश्वकर्मा जयंती तथा समाज प्रबोधन मेळावा राजाराम येतील ग्राम पंचायत कार्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करत होते.
या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा चरणदास बावने,अध्यक्ष वैदभिर्य गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ,नागपूर,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विनोद बावने,तालुका अध्यक्ष,अहेरी शाखा,तर विशेष अतिथि म्हणून पंचायत समिती सभापती श्री.भास्कर तलांडे,राजारामचे सरपंच श्री.विनायक आलाम,श्री.सुरेश मांडवगडे,सचिव वैदभिर्य गाड़ी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपूर,श्री.रवि सोनटक्के,उपजिल्हाप्रमुख महासंघ नागपूर,मा.दिनकर सोनटक्के,सदस्य,मा.धर्मदास नैताम,जिल्हाध्यक्ष गडचिरोली,मा.ईश्वर मांडवकर,संघटक अहेरी,मा.शंकर चंदनखेडे,माजी तालुका अध्यक्ष अहेरी,मा.श्रीधर दुग्गीरालापाठी पत्रकार,मा.नामदेव बावने,सामाजिक कार्यकर्ता अहेरी,मा नामदेव मांडवकर सा.कार्यकर्ता एटापली,श्री.सुरेश औतकर,सौ.लक्ष्मीबाई बावने महिला तालुका अध्यक्ष अहेरी,श्री.मोहन मेश्राम,युवा अध्यक्ष अहेरी,मा.वसंत मेश्राम,सदस्य अहेरीमा.सत्यनारायण चंदनखेडे पेरमिली ,श्री.नारायण कम्बगोनिवार ग्रा.प.सदस्य,
आदि मंचावर उपस्थित होते,
प्रारंभी प्रभु विश्वकर्मा व वद्नीय तुकाडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तथा दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी उदघाटन श्री.चरणदास बावने यांनी मार्गदर्शन करत बोलत होते समाजाने आता शैक्षनिक,राजकीय क्षेत्रात आज गाडी लोहार समाजाने पल्ला गाठण्याची गरज आहे.तसेच युवकांनी नोकरीचा मागे न लागता व्यवसायीक क्षेत्रात पूढे येवून स्वतःच व समाजाच्या विकास करावा असे मत व्यक्त केले.
अध्यक्ष श्री.विनोद बावने यांनी अध्यानिय भाषणात समाजबांधवांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा.ईश्वर मांडवकर,तर संचालन श्री.पत्रूजी चंदनखेडे,आभार प्रदर्शन श्री.मोहन मेश्राम यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.रमेश बामनकर,श्री.गोपाल चंदनखेडे,श्री.राकेश कोसरे,श्री.साईबाबा बामणकर,दिलीप मेश्राम,विठ्ल बामणकर,आशिष चंदनखेडे,नितीन बामणकर,देवाजी बामणकर,विश्वास मेश्राम,संतोष बामणकर,रेणुका बामणकर,आदिनी सहकार्य केले.
यावेळी गावातील,तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *