Uncategorized आपला विदर्भ

अतिदुर्गम लोहा कल्लेड गावाची सर्वांगीण विकास करू…कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
◼️गावातील व नागरिकांचे समस्या जाणून घेतली ◼️
◼️चारचाकी वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्याने मोटर सायकलनी प्रवास केले.
🔸अहेरी तालुका मुख्यलायापासून ७० कि.मि. अंतरावर असलेल्या अति संवेदनाशिल व आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून जिमलगटा पासून २०-३० कि.मि.अंतरावर असलेले *लोहा,कल्लेड, कोंजेंड,*गांवात अनेक प्रमुख समस्या आवासुन उभे आहेत.या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नाहीत,विज नाहीत,मात्र या कडे दुर्लक्ष केले जात आहे.
काल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी सदर परिसरात दौर केले यावेळी लोहा,कल्लेड,कोंजेड,आदि गांवात भेट देवून नागरिकांशी सखोल अशी चर्चा करून समस्या जाणून घेतले.असून जि.प.अध्यक्ष गांवात आले असल्याचा खूप आनंद झाले असल्याचा मनोगत नागरिकांनी व्यक्त केले,नागरिकांच्या मने होते या गांवात स्वंतत्रा नंतर येणारे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष आहेत अशी भावना व्यक्त केले असून आदिवासी नूत्य करीत डोल घेवुन नाच करत भव्य स्वागत केले.
या गांवात जाण्यासाठी रस्ता नसल्याने देचली पेठा या गांवात चारचाकी वाहन ठेवून समोरच प्रवास मोटर सायकलनी करून कल्लेड येतील प्रसिध्द शिव मंदिरात जावून दर्शन घेवुन कोंजेड येते विद्युत जनित्रांच्या लोकार्पण केले.त्यानंतर लोहा गांवात दुहेरी नळ योजनेच्या लोकार्पण करून नागरिकांसोबत तीन तास चर्चा करून समस्या ऐकून घेतले व निराकरण करून देण्याच्या ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *