आपला विदर्भ

छत्रपती शिवरायांचे अनमोल विचार आचरणात आणणे गरजेचे ..जि.प.अध्यक्ष कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
◼️ जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या मत
🔸व्येंकटारावपेठा येते शिवजयंती उत्सवात साजरी 🔸
⭐स्वराज्याची स्थापना करणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सगळीकडे साजरी होत आहे.शिवाजी राजे असे महापुरुष होऊन गेले कि,त्यांचे कार्य,पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही ताजी आहे.आजही आपण त्याचा काळा संदर्भात त्याचा स्वराज्याची निर्मितीचा विचार करायला लागतो.
शिवाजी महाराज म्हणत होते कधीही आपला डोकं वाकवू नका,नेहमी उंचीवर ठेवा,संकटाचा सामना शत्रूचा समोरच करण्यात वीरता आहे अस नाही,खरी वीरता विजयात आहे.व सर्वप्रथम राष्ट्र नंतर गुरु, मग पालक,मग देव सर्वप्रथम स्वतःकडे नाही तर राष्ट्राकडे पहा.असे अनमोल विचार त्यांनी सांगितले हे विचार सर्वांनी आचरणात आणला तर जीवन बदलेल असे मत जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी व्यक्त केले.
जय जिजाऊ कुंणबी सामाजिक संघटना येंकटारावपेठा यांच्या वतीने व्येंकटारावपेठा येतील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमावेळी बोलत होते.
या जयंती कार्यक्रमाला मा.संपत सिडाम ग्रा.प.सरपंच व्येकटरापेटा, उपसरपंच शामराव राऊत,भांगरे सर,मा.निर्मला वैद्य म्याडम,मा.लुटे सर,मा.बुरान सर,शैलेश छापडे,मा.अशोक पागे पत्रकार,मा.श्रीनिवास राऊत,मा.शंकर राऊत,गौरय्या राऊत,समक्का राऊत,मांदव राऊत,लक्ष्मीनारायण राऊत व गावकरी नागरिक उपस्तीत होते.
कार्यक्रमाचे संचालन श्री.राऊत सर यांनी केली.कार्यक्रमासाठी कुंणबी आयोजन मंडळाने सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *