आपला विदर्भ

ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी वेतनश्रेणी आणि पेन्शनसाठी बी.डी. ओ. खिराडे यांना दिले निवेदन.

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा शहर प्रतिनिधी..

राज्य सरकारने राज्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी आणि पेन्शन देण्यासाठी 2 आगस्ट 2017 ला एक समिती गठित केली असून या समितीने अद्यापही सरकारला अहवाल सादर न केल्यामुळे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शन पासून वंचित राहावे लागत आहे.

समितीने आपलं अहवाल लवकरात लवकर सरकारकडे सादर करून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शन लागू व्हावे म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज कामगार दिनानिमित्त ग्राम पंचायत कर्मचारी संघटनेचे पदादिकाऱ्यांनी सिरोंचा येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी देव्हारे यांच्या मार्फतीने आज संवर्ग विकास अधिकारी एस.के.खिराडे यांना निवेदन दिले.