आपला विदर्भ

विय्यांमपल्ली येथे चिपळी रामायणाचे आयोजन !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा तालुक्यातील विय्यमपल्ली(रायपेठा)येथे श्री अभय अंजनेय मंदिर कडून 21 फेब्रुवारी रात्री 8 वाजता चिरताला रामायनाम(चिपळी रामायण)कार्यक्रमच्या आयोजन करण्यात आले.
राम लीला कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी तंटामुक्त अध्यक्ष मारानाजी पडलावार हे होते.प्रमुख अथिती म्हणून माजी सभापती व विध्यमान जिल्हा परिषद सदस्य जयसुधा जनगाम,सरपंच विजया आसाम, आविस तालुका अध्यक्ष बनाय्या जनगाम,ग्रा.प.सदस्य प्रेमीला गावडे,आविस सल्लगार रवी सल्लम,प्रतिष्टीत नागरिक शंकर पानेम,राजाम दुर्गम,सोमय्या दुर्गम,वेंकटी आसाम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सर्व प्रथम प्रभू रामचंद्र आणि माता सितादेवी यांचे प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कर्यकामाचे सुरुवात करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील लहान चिमुकल्यानी नृत्य करून मान्यवरांचे मन जिंकले.रामायणम सारख्या धार्मिक कार्यक्रम गावामध्ये आयोजन केल्याने गावात धार्मिक वातावरण निर्माण होतो. लुप्त होत चालेल्या रामायनाम पुन्हा एकदा आठवण होत आहे.आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमाने जनगाम यांचे प्रयत्नाने ग्राम पंचायत गरकापेटा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये अनेक विकास कामे आणून गाव विकासासाठी आविस नेहमी काठिबद्ध असून पुढेही विकास कामेसाठी निधी कमी पडू देणार नाही असे उदघाटनिय भाषेनात जिल्हा परिषद अध्यक्ष कांकडलावार बोलत होते.कांकडलवार यांनी तेलगू भाषेत भाषण दिले हे विशेष.यावेळीआविस सल्लगार रवी सल्लम यांनी सुद्धा उपस्थित स्रोत्यना रामायनाम बद्दल विस्तृत माहितीसह बहुमूल्य मार्गदर्शन केले.
चिरताला रामायनाम पाच दिवस चालणार असून परिसरातील नागरिकांनी येऊन रामायनामाचे आस्वाद घ्यावे असे संतोष पाडालावार यांनी आवाहन केले आहे. रामायनाम कार्यक्रमामुळे गावात पाच दिवस धार्मिक वातावरण निर्माण होत
असल्याने गावकरी आनंद व्यक्त करत आहेत.संतोष पडालवार यांनी पुढाकार घेऊन गावातील युवा व प्रतिष्ठित नागरिकांनी हे कार्यक्रम आयोजित केले आहे.
यावेळी मधुकर बुराम,संतोष बचालकुरा,सुरेश बचालकुरा,जंपन्ना आसामपल्ली,दुर्गेश पानेम,समय्या पानेम,सतीश बचालकुरा,राजान्ना बाचालकुरा,गदान्ना येताम आदी मान्यवर उपस्थित होते. रामायणम पाहण्यासाठी विय्यामपल्ली परिसरातील हजारो नागरिक आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास इप्पावार यांनी केले.आभार प्रदर्शन महेश बुराम यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *