आपला विदर्भ छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज

आसरअल्ली येथील भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल . आसरअल्ली पोलिसांनी केली श्रीकांत उर्फ बबलू सुगरवार ला अटक

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क ..

सिरोंचा..

तालुक्यातील आसरअल्ली पोलिसांनी आज आररेल्ली येथील भाजपचे कार्यकर्ता श्रीकांत उर्फ बबलू सुगरवार विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आज त्याला अटक केल्याची विश्वासनीय माहिती मिळाली आहे.

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील रायगुडम येथे दोन बंधाऱ्यांची बांधकाम मागील महिन्यापासून सुरु आहे. हे दोन्ही कामे ई टेंडर पद्धतीने संबंधित कंत्राटदारांनी लिलावात घेतले. व कंत्राटदारांनी कामालाही सुरुवात केले. बंधाऱ्यांची काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून मला दोन्ही बंधाऱ्यांची एक लाख रुपये द्या नाहीतर मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुमची कामाचीे तक्रार करू अशी धमकी बबलू सुगरवार यांनी कंत्राटदारांना दिली.

कंत्राटदारांनी एक लाख रुपये ऐवजी दहा हजार रु 4 एप्रिल ला श्रीकांत सुगरवार ला दिले.तदनंतर उर्वरित 90 हजार रुपयांसाठी कंत्राटदारांना तब्बल 22 मार्च ते 30 मार्च दरम्यान 32 वेळा फोन करून पैशांची मागणी केल्याची माहिती आहे. आसरअल्ली येथील कंत्राटदारांनी सुगरवार ची पैशाची मागणी करतानाचे फोन टेपिंग केले व दहा हजार रु.देतांना मोबाईलने विडिओ शूटिंग हि काढून ठेवल्याची माहिती आहे.

रायगुडम येथील दोन्ही बंधाऱ्यांची कामे हे अंदाजपत्रका पेक्षा कमी दरात घेऊन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावे म्हणून कंत्राटदारांनी बंधाऱ्यांची बांधकाम काम करीत होते. परंतु या विकात्मक कमला भाजप कार्यकर्ता आड येत होता.. वारंवार पैशाची मागणी करीत होता.

भाजप कार्यकर्ता श्रीकांत उर्फ बबलू सुगरवारला उर्वरित 90 हजार रु. देणे कंत्राटदाराना देणे शक्य होत नसल्याने कंत्राटदारांनी आसरअल्ली पोलीस स्टेशन ला रितसर बबलू विरुद्ध तक्रार दाखल केले.

कंत्राटदारांनी दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून बबलू सुगरवार पैशाची मागणी करतानाचे फोन टेपिंग व मोबाईल व्हिडिओ शुटींग पाहून आज आसरअल्ली पोलिसांनी भाजप कार्यकर्ता श्रीकांत उर्फ बबलू सुगरवार यांच्या विरुद्ध भादंवि 384,385 व 506 अन्वये गुन्हा दाखल करून बबलू सुगरवार ला अटक केली आहे.पुढील तपास आसरअल्ली पोलीस करीत आहे.