आपला विदर्भ

जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतले लखामेढा पहाडावरील पंच पांडव देवांची दर्शन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क **जि.प.अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी लखामेळा येते दर्शन घेतले **
◼️ आविसचे पदाधिकारी व कुटुंबासहित स्नेहभोजन केले.
🔸अहेरी तालुक्यातील रेपनपली जवळ असलेला लखामेळा डोंगरावर खडतर प्रवास करून लखामेळा येते जावून प्राचीन काळातील कुंतीदेवी,पंच पांडव यांची लक्षागृह आहे येते जावून भिम,अर्जुन,नकुल,सहदेव, युधिष्ठिर,यांचा दर्शन घेतले.
विशेष म्हणजे सदर डोंगर (पहाळ) रेपनपली वरून आठ कि.मि.अंतरावर असून डोंगराच्या पायथ्यापासून वर चार कि.मि.अंतर खडतर आहे.मोठमोठे दगड त्यातच लहान पायदळ रस्ता असून डोंगरावर चढ़न्यास दोन तास अवधी लागतो.
सदर लखामेळा येतील प्राचीन इतिहास असून बुजुर्ग नागरिक सांगतात कि,पंच पांडव याठिकानी प्राचीन काळी वास्तव्यस होते.डोंगरावर आजही ९इंची विटा असून नैसर्गिकरीत्या तयार झालेली एक तलाव असून पाहण्यासारखे आहे.मात्र याकडे दुर्लक्ष केले गेले आहे.
शिवरात्री ला या ठिकाणी आदि जत्रा भरत होता मात्र गेल्या तीन चार वर्षापासून बंद करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधि या ठिकाणी जात नसतात मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार पहिल्याच या ठिकाणी भेट देवून दर्शन घेतले व पूर्ण परिसराची पाहणी केली.
या वेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,प.स.सदस्या सौ.सुरेखा आलाम,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार,इंदारामचे उपसरपंच श्री.वैभव कंकडालवार,श्रीनिवास राऊत,कविराजावार,प्रशांत गोडसेलवार,राकेश सड़मेक,प्रभाकर सड़मेक,दिवाकर आलाम,नामदेव पेंदाम,इरसाद शेख,आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *