आपला विदर्भ

चंद्रपूर येथे गांनली समाजाकडून ना.वडेट्टीवार व जि.प.अध्यक्ष कंकडलवार यांच्या सपत्नीक भव्य सत्कार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..गांनली समाजाकडून नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री ना.विजयभाऊ वड्डेटीवार व गडचिरोलीचे जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांची सप्त्नीक सत्कार…!
✍️चंद्रपुर येथिल गांनली समाज बहुउद्देशीय सेवा मंडळ च्या वतीने चंद्रपुर येतील गुरुदेव लॉन ,कर्मेल अकडमी शाळेजवळ अयप्पा मंदिर,तूकूम चंद्रपुर येते सभा आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात महाराष्ट राज्याचे बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री ना.श्री.विजयभाऊ वड्डेटीवार,व गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांची सप्त्नीक सत्कार कार्यक्रम घेण्यात आले होते.यावेळी ना.श्री.विजयभाऊ वड्डेटीवार व व त्यांची अर्धांगीनी सौ.किरणताई वड्डेटीवार व गडचिरोली जिल्हाचे जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार व त्यांची अर्धागीनी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांच्या सप्त्नीक शाल व श्रीपाळ देवून सत्कार करण्यात आले आहे.
गांनली समाज बहुउद्देशीय सेवा मंडळ चंद्रपुर कडून सामूहिकपणे सत्कार केले.
सत्कार करतेवेळी गांनली समाजाचे अध्यक्ष श्री.प्रकाशभाऊ सुरमवार,उपाध्यक्ष श्री.पंकज संगीडवार,सचिव श्रीकांत गद्दावार,समाजसेवक किशोर वरंगटीवार,भास्कर वा.कुंदावार,रवि पोटावार,बबनराव चनांवार,प्रदीप मूनगेलवार,व समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या संचालन श्री.मानेश संतोषवार,तर आभार प्रदर्शन श्री.विलास कोमलवार यानी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *