आपला विदर्भ

सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा करा !

सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी ची सुविधा करण्याबाबत *आविसं सल्लागार रवी सल्लम यांची मागणी*

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..सिरोंचा….गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचं टोकावर वसलेल्या सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या सोय सुविधेसाठी सरकार व संबंधित विभागाने सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी आदिवासी विद्यार्थी संघाचे सल्लागार रवीभाऊ सल्लम यांनी मागणी केली आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयात अद्यापही सोनोग्राफी सुविधा उपलब्ध नसल्याने शहरी व तालुक्यातील ग्रामीण भागातील गरोदर महिलांसह अन्य रुग्णांना सोनोग्राफी काढून घेण्यासाठी जिल्हा मुख्यालय गडचिरोली,चंद्रपूर व वेळप्रसंगी शेजारील राज्य तेलंगणात धाव घ्यावं लागतं असून परिणामी गरोदर महिलांसह अन्य बिमारीग्रस्त रुग्णांना आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास सहन करावं लागतं आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्या गरोदर माता व सर्वसामान्य रुग्णांना नेहमी सोनोग्राफी काढण्यासाठी शेजारील राज्य तेलंगणात जावं लागतं असल्याने रुग्णांना विनाकारण हजारो रु खर्च करावा लागत आहे.हा खर्च सर्वसामान्य रुग्णांना परवडणारा नसल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून दिल्यास रुग्णांची आर्थिक व मानसिक त्रास कमी होईल. सिरोंचा तालुका हे राज्यच व जिल्ह्याचं शेवटचं टोकावर वसलेल्या अविकसित तालुका आहे. या तालुक्यात आरोग्य सेवेची खूप अभाव दिसून येतात.ग्रामीण रुग्णालयासह आरोग्य विभागात अनेक महत्वपूर्ण पदे अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने व सरकारने नव्याने पदभरती न केल्याने याची फटका ही तालुक्यातील रुग्णांना बसत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी या समस्यावर तात्काळ दखल घेऊन येथील ग्रामीण रुग्णालयात गरोदर माता व सर्वसामान्य रुग्णांसाठी सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी आविस सल्लागार रवीभाऊ सल्लम यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *