आपला विदर्भ

हिंगणघाट येथील नागरिकांच्या मदतीला धावले जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

■ जिल्हा परिषद अध्यक्ष कांकडलवार यांनी जपली मानसुकी.
नागेपल्ली येथे अडकलेल्या यवतमाळ
नागेपल्ली येथे अडकलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील हिंगणघाट,येथील 30 ते 40 कुटुंब उपजीविकेसाठी नागेपल्ली येतील राजे धर्मराव शाळेच्या बाजूला असलेल्या प्ले ग्राऊंड मध्ये राहत होते.
कोरोना मूळे देशात 21 दिवसाच्या जनता कर्फ्यु आणि संचाटबंदी लागू झाल्याने दळणवळण आणि नागरिकांची ये जा पूर्णपणे बंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातुन आलेल्या 40 नागरिकांवर उपासमारीची पाळी आल्याची माहिती जि.प.अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार याना मिळतच त्यांनी वेळेचा विलंब न करता तिथे असलेल्या लोकांशी संपर्क साधून त्यांचे समस्या जाणून घेत त्या 40 नागरिकांना पोटभर जेवण आणि पाण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.
तुम्हाला काहीही अडचण निर्माण झाल्यास माझ्या मोबाईल वर संपर्क साधल्यास मी तुमच्या अडचणी दूर करण्याची आश्वासन दिले आहे.तसेच अहेरीचे तहसीलदार याना प्रशासनाच्या वतीने त्यांचे खाण्या पिण्याची व्यवस्था व आरोग्य तपासणी करण्याचे सूचना केले.या कार्यामुळे नागेपल्ली येथे जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार याच्या रूपाने माणुसकीचा दर्शन झाल्याची अडकलेल्या 40 नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *