आपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय

पत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा.. गडचिरोली व चंद्रपूर जिह्यातील नामवंत पत्रकार न्यूज 18 लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी यांनां मंगळवारला पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात मानाचा समजल्या जाणाऱ्या स्वर्गीय वरूणराज भिडे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आला होता. या करक्रमाचे संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार व शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन पत्रकार महेश तिवारी यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी शिवसेना पक्षाचे प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्तित होते.

यावेळी महेश तिवारी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मागासलेपणा व नक्षलवाद या विषयावर अभ्यासपूर्ण मनोगत महेश तिवारी यांनी व्यक्त केले.

पत्रकार महेश तिवारी यांना मनाचे पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.