आपला विदर्भ

आपत्कालीन सेवेसाठी सामाजिक कार्यकर्ता ताटीकोंडावार यांनी स्वतःचे वाहन केले तहसीलदारांकडे सुपूर्द

■ विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

■ वाहन आपत्कालीन सेवेसाठी निशुल्क राहणारअसल्याची माहिती.अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सेवेसाठी त्यांनी आपली स्वतःची चारचाकी वाहन अहेरीचे तहसीलदार यांचे कडे सुपूर्द करण्यात आले आहे. ताटीकोंडावार यांचे स्वतःचे बोलेरो वाहन क्र mh 40 ka 5425 मालकीचे वाहन देशासह राज्यात कोविड 19 हे महामारी साथरोग पसरल्याने जनजीवन विस्कळीत होत आहे. अश्या वेळी आपत्कालीन सेवेसाठी कमलापूर परिसरात विविध विभागात वाहनांची आवश्यकता असल्याने मी माझे वाहन 28 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत निशुल्कपणे नागरिकांच्या सेवेत राहत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावार यांनी स्टार टीव्ही 9 मराठीला सांगितले. वाहन तहसीलदार अहेरी याच्या कार्यालयात असून या निशुल्क वाहनांची लाभ घेण्याची आवाहन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *