आपला विदर्भ

कोरोना संकटकाळी ग्रा.पं. ची चौदा वित्त आयोगाची निधी गोरगरिबांसाठी खर्च करण्याची परवानगी द्या… रजनीता मडावी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

देशासह राज्यात सध्या कोरोना संकटात सर्वसामान्य जनता अडकले असून देशात व राज्यात सुरू असलेल्या लॉकडॉऊन मुळे मुख्यतः गोरगरीब मजुरांना या संकटाची जोरदार फटका बसलेलं दिसत आहे. लॉकडॉउनमूळे संकटात सापडलेल्या गोरगरीब मजुरांना दिलासा मिळवून देण्यासाठी अहेरी तालुक्यातील कमलापूरचे ग्राम पंचायत चे सरपंच रजनीता मडावी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीदारांना निवेदन देऊन ग्राम पंचायत मध्ये शिल्लक असलेल्या चौदा वित्त आयोगाचे निधी जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्याची परवानगी मागितली आहे.

मुख्य कार्यपालन अधिकारी व तहसीलदार अहेरी यांना दिलेल्या निवेदनात सरपंच मडावी यांनी,सध्या कोरोना संकटामुळे ग्राम पंचायत हद्दीतील गोरगरीब मजुरांना उपासमारीची वेळ आलेली असून चौदा वित्त आयोग निधीतुन रस्ते व नाली बांधकाम न करता जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यास परवानगी दिल्यास ग्राम पंचायत जीवनश्याक वस्तू खरेदी करून ग्राम पंचायत हद्दीतील गोरगरीब जनतेला वाटप करणार असल्याची नमूद आहे. चौदा वित्त आयोगाची निधी जीवनश्याक वस्तू खरेदी करण्यासाठी परवानगी मागणारे बहुतेक जिल्यातील पाहिली ग्राम पंचायत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *