आपला विदर्भ

रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत सिरोंचा येथे पोलीस विभागाकडून भव्य रॅली

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा… रस्ता सुरक्षा पंधरावडा अभियानाअंतर्गत आज सिरोंचा पोलिसांनी सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश घारे व पोलीस उपनिरीक्षक पतंगराव पाटील यांच्या प्रमुख उपस्तित आज शहरात रॅली काढून रस्ता सुरक्षा पंधरावडा अंतर्गत वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी आदिवासी आश्रम शाळेचे तसेच डॉ. सी.व्ही.रमण महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना वाहतूक नियम पाळण्याविषयी मार्गदर्शनकेले आणि रॅली द्वारे,वाहनचालकांना आणि नागरिकांना माहिती देऊन योग्य मार्गदर्शन केले.

या रॅलीत उपविभागीय पोलीस अधिकारी , पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस शिपाई व होमगार्ड उपस्तित होते.