आपला विदर्भ ताज्या घडामोडी

अहेरी तालुक्यातील खांदला व राजाराम ग्रा.पं. मध्ये तेंदूपत्ता लिलाव संपन्न

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

अहेरी..

अहेरी पंचायत समिती अन्तर्गत येत असलेल्या खांदला व राजाराम ग्राम पंचायतीच्या तेंदूपत्ता लिलाव आज ग्रामसभा आयोजित करून करण्यात आली .
या लिलावाला एकच कंत्राटदार एम.जी.पटेल उपस्तित होवून प्रति गोनी 4000 म्हणजे प्रति शेकडा मजुरी 350रुपए दर प्रमाणे देण्यात येईल. .असे कंत्राटदार सांगितले,
मात्र कुणीच कंत्राटदार लिलावाला येत नसल्याने ग्रामसभा ला उपस्तीत झालेले नागरिकांनी गेल्यावर्षी प्रति गोनी 16000हजार रुपए प्रति शेकडा 1600रुपए मिळले होते,त्यातुलनेत बरच कमी झाला होता.मात्र एकच कंत्राटदार लिलावात बोलणीसाठी आल्याने त्यांनाच कंत्राट देण्यात आली. यामुळे ग्राम पंचायतीला नुकसानीला सामोरे जावं लागणार आहे.

या ग्रामसभेला अध्यक्ष म्हणून खांदला ग्रा.पं. सरपंच सौ.शंकुतला कूड़मेथेहोते. पंचायत समिती सदस्य भास्कर तलांडे,उपसरपंच गुरुदास पेंदाम,सदस्य वंदना अलोने,सुधाकर आत्राम.व दुर्गा आलाम,नारायण आत्राम,सदु पेंदा म,माधव कुडमेथे,व नागरिक उपस्तित होते.संचालन व आभार प्रदर्शन सचिव कु.एस.सड़मेक यांनी केली.
राजाराम ग्राम पंचायत 450रुपए झाले असून प्रति शेकडा मजुरी 350 व 100 रुपए रायलटी म्हणून मिळले.राजाराम मधे कंत्राटदर मंगेश अशोक मल्लेलवार यांना मिळाली.
सभेला सरपंच विनायक आलाम,सदस्य सत्यवान आलाम,नारायण कम्ब्गोनिवार,सतीश सड़मेक,आनंद वेलादी,कोष समिती अध्यक्ष नागेश कन्नाके,अनिता आलाम,पुष्पां तौरेम,शारदा आलाम,व गावकरी उपस्तीत होते.