आपला विदर्भ ताज्या घडामोडी

झिंगानुर गावावर पसरली शोककळा ..त्या अपघातातील मृतकांची संख्या चार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा प्रतिनिधी..

तालुक्यातील झिंगानुर येथील वऱ्हाड बुधवारी मेटाडोर या वाहनाने कुरखेडा तालुक्यातील खरकडा येथे लग्नासाठी जात असतांना सिरोंचा आल्लापल्ली या मार्गावरील मोसम या गावाजवळ मेटाडोर झाडाला आदळल्याने यात जवळपास 50 जण जखमी तर एक महिला ठार झाली होती.

प्राप्त माहितीनुसार त्या अपघातातील मृतकांची संख्या चारवर पोहचली असून झिंगानुर येथील मासी मल्ला आत्राम, कुल्ले पोचा मडावी,ताराबाई कापा आत्राम व वंजी कोहला कुळमेथे मृत्यू पावले. यामुळे झिंगानुर या गावावर शोककळा पसरली आहे.