आपला विदर्भ

टेकडाताल्ला येथील प्रा.आ.केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली अचानक भेट!

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा तालुका प्रतिनिधी..

तालुक्यातील टेकडाताल्ला येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्राला आज गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी अचानक भेट देऊन आरोग्य केंद्रातील व गावातील समस्या जाणून घेतले.

यावेळी जाफराबाद ग्राम पंचायतचे सरपंच सडमेक बापू व कंत्राटदार सुधाकर पेद्दी यांनी टेकडताल्ला व जाफराबाद येथील अपूर्ण अवस्तेत असलेली महसूल मंडळ कार्यालयाची बांधकाम पूर्ण करणे, गावात बी. एस .एन. एल. मोबाईल टॉवर उभारणे, बोरामपल्ली नाल्यावर पूल बांधकाम करणे , माटुतोगु नाल्यावर बंधारा बांधकाम करणे आणि तेंदूपत्ता तोडाई विषयी आणि आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केले.