आपला विदर्भ

सिरोंचा येथील जिओ टॉवर दहा दिवसात सुरु करा..अन्यथा आंदोलन..

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा शहर प्रतिनिधी

मागील वर्षी सिरोंचा शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये जिओ या खाजगी टॉवर उभं केले असून टॉवरची काम पूर्ण होऊन सुद्धा अद्याप सुरु न केल्यान जिओ टॉवर दहा दिवसाचे आत सुरु करण्याची मागणी येथील युवकांनी केली आहे.

काल सिरोंचा येथील राकेश गरपल्लीवार, महाराज परसा,लक्ष्मण मेकला, महेश गादम, आकाश परसा, मंगेश जाधव, साईचरण पेद्दापोल, जीतीन आडेपू आदी युवकांनी सिरोंचाचे तहसिलदार रमेश जसवंत यांना भेटून जिओ टॉवर सुरु करण्यासाठी तहसिलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

सिरोंचा येथील बी एस एन एल मोबाईल सेवा दिवसेंदिवस मोबाईल धारकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने येत्या दहा दिवसात जिओ टॉवर सुरु करावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिली आहे.