आपला विदर्भ

जाफराबाद येथील बचत गट महिलांनी टाकली दारू अडयावर धाड !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा तालुका प्रतिनिधी

सिरोंचा – तालुक्यातील उपपोलिस स्टेशन बामणी अंतर्गत येणाऱ्या जाफ्राबाद येथील बचत गट महिलांनी अवैध दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकून दारूसाठी वापरला जाणारा कच्चा माल मोहफुलाचा सडवा काल नष्ट केला
उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस स्टेशनचे बामणीचे प्रभारी अधिकारी राहूल वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे व पोलिस पथकासह जाफ्राबाद येथील श्रीराम स्वयंसहायता महिला बचत गटाच्या पुढाकाराने घराघरात दारू काढण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल साठवून ठेवलेला गुळामोहाचा सडवा नाश केला. तसेच अवैध दारू बनविणारा एका दारूविक्रेत्याच्या घरी महिलांनी पोलिसांसोबत धाड टाकून २५ लिटर गुळामोहाची दारू पकडून गावातील दारूबंदीसाठी पुढाकार घेतला.
श्रीराम स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या अध्यक्षा दुर्गाक्का आत्राम, सदस्या शारदा मेश्राम, कमलक्का आत्राम, दुर्गाक्का आत्राम तसेच महिला गटाच्या १५ ते २० महिला सदस्य मागील आठवड्यात परिवर्तन महिला बचतटाने पुढाकार घेऊन गावठी दारूचे अड्डे नष्ट केले होते. महिला गटांच्या पुढाकाराने केलेल्या या धडक कारवाईमुळे गावातील दारूविक्रेत्यांवर वचक बसली आहे. परिसरातील नागरिकांकडून महिला बचत गटाचे कौतुक होत आहेत. यावेळी बामणी पोलिसांनी महिला गटांना दारूबंदीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.