आपला विदर्भ

सिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा शहर प्रतिनिधी ..

सिरोंचा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे अडीच वर्षासाठी अनु.जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव असून आज या जागेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसच्या श्रीमती मरिया जयवंत बोल्लामपल्ली यांनी नामांकन दाखल केली आहे.

आज पासून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचे पहिलाच दिवशी नगर पंचायत सभागृहात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यांच्या उपस्तित्तीत आज मरिया बोलमपल्ली यांनी आपली नामांकन मुख्याधिकारी भरत नंदनवार यांच्याकडे दाखल केली .29 मे ला निवडणूक पार पडणार आहे.