आपला विदर्भ

नवेगाव येथील समस्या प्राधान्याने सोडवू..जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार

विदर्भक्रांती न्युज नेटवर्क

*अहेरी तालुक्यातील नवेगाव येथील गावकऱ्यांची समस्या जाणून घेतांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार*

*नवेगाव येथील गावकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या समोर मांडले अनेक समस्या

*अहेरी*..तालुक्यातील नवेगाव येथील गावातील गावकऱ्यांची अडीअडचणी व गावातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी आज खुद्द गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गावाला भेट दिली.
यावेळी नवेगाव या गावातील गावकऱ्यांनी विविध समस्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या समोर मांडले असता अथक प्रयत्न करून लवकरच नवेगाव या गावातील समस्या आपण प्राधान्याने सोडवू असे आश्वासन उपस्तीत गावकऱ्यांना दिले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कंकडालवार नवेगाव येथील गावकऱ्यांसोबत चर्चा करतांना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पिंटूभाऊ मोहूर्ले, विलास शेंडे, पेंटू नागोसे, महेंद्र वसाके, नागोराव सोनूले , बापू मिकोडे, साईनाथ नागोसे, अशोक कोटरंगे, विश्वनाथ गुरनुले, अमित येनपप्रेड्डीवार, राजू बावणे सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार हे स्वतः नवेगाव येथे जाऊन गावातील गावकऱ्यांची समस्यांबद्दल गावकऱ्यांशी आस्थेने विचारपूस करून गावातील सर्व समस्या प्रधान्यांने सोडवून देण्याची आश्वासन दिल्याने नवेगाव येथील गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.