आपला विदर्भ

भ्रष्टाचार निवारण समिती एटापल्ली तालुका अध्यक्षपदी प्रज्वल नागुलवार यांची निवड

विदर्भक्रांती न्युज नेटवर्क

*भ्रष्टाचार निवारण समिती एटापल्ली तालुका अध्यक्षपदी प्रज्वल नागुलवार यांची निवड*

*एटापल्ली*…येथील सामाजिक युवा कार्यकर्ते व आदिवासी विद्यार्थी संघाचे सल्लागार प्रज्वलभाऊ नागुलवार यांची जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे एटापल्ली तालुका अध्यक्षपदी समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद देविकार यांनी निवड केली आहे.
या निवडीबद्दल नागुलवार यांची आविसचे विदर्भ नेते, माजी आमदार दीपक दादा आत्राम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार, जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनगाम,जिल्हा परिषद सदस्या सारिका आईलवार, सुनीता कुसनाके, सरिता रमेश तैनेनी, जि.प.सदस्य अजय नैताम,मनोहरराव कोरेटी,माजी जि.प.सदस्य केसरी पाटील उसेंडी,पिंटूभाऊ मोहूर्ले, श्रीकांत बंडमवार, सिरोंचा तालुका अध्यक्ष आविस बानय्या जनगाम,आविस सल्लागार रवी सल्लम सह एटापल्ली तालुक्यातील आविसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
प्रज्वलभाऊ नागुलवार यांची भ्रष्टाचार निवारण समिती तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.