आपला विदर्भ

आवलमरी येथील नवनिर्वाचित ग्रा.पं. सरपंच व सदस्यांचा सत्कार

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

अहेरी तालुक्यातील मौजा आवलमरी ग्रामपंचायत येथे नुकताच सरपंच व सदस्यांची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. यामध्ये आविसचे सरपंच पदासह एकूण 8 ग्रा.प.सदस्य निवडून आले. नवनिर्वाचित कमिटीची सत्कार जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते आवलमरी येथे नवनिर्वाचित सरपंचा सौ.सुनंदा व्येंकना कोडापे सह ग्राम पंचायत सदस्यांची शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभाला यावेळी जि.प.सदस्य अजयभाऊ नैताम. माजी सरपंच मारोती मडावी. नवनिर्वाचित सरपंचा सौ.सुनंदा व्येंकना कोडापे. अजय कुमरम ग्रा.प.स.कमलाबाई आत्राम. ग्रा.प.स.चिरंजीव चिलवेलवार. ग्रा.प.स.वसंत तोरेम. ग्रा.प.स.अमसूबाई सिडाम.ग्रा.प..स.विमलाबाई चटारे. ग्रा.प.स.प्रशांत गोडसेलवार. अशोक झाडे. प्रकाश दुगे. लक्ष्मण आलाम.व इतर गावकरी उपस्थित होते.