आपला विदर्भ

आवलमरी ग्रामपंचायत मधील विविध समस्यांवर चर्चा

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

*अहेरी तालुक्यातील आवलमरी येथील गावकऱ्यांची समस्या जाणून घेतांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार…* आवलमरी येथील गावकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या समोर मांडले अनेक समस्या…. अहेरी … तालुक्यातील आवलमरी येथील गावातील गावकऱ्यांच्या अडीअडचणी व गावातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी आज खुद्द गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष. अजयभाऊ कंकडालवार यांनी गावाला भेट दिली. यावेळी आवलमरी या गावातील गावकऱ्यांनी विविध समस्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या समोर मांडले असता अथक प्रयत्न करून लवकरच आवलमरी या गावातील समस्या आपण प्राधान्याने सोडवु असे आश्वासन उपस्थित गावकऱ्यांना दिले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कंकडालवार आवलमरी येथील गावकऱ्यांसोबत चर्चा करताना जि.प.सदस्य. अजयभाऊ नैताम.माजी सरपंच मारोती मडावी. नवनिर्वाचित सरपंचा सुनंदा व्येंकना कोडापे. नवनिर्वाचित ग्रा.प.सदस्य. अजय कुमरम.कमलाबाई आत्राम. लक्ष्मी बाई मूरमाडे. चिरंजीव चिलवेलवार. अमसूबाई सिडाम. वसंत तोरेम. विमलाबाई चटारे.अशोक झाडे. प्रशांत गोडसेलवार. प्रकाश दुगे. शंकर कोंडागुले. लक्ष्मण आलाम. झाडे पोलीस पाटील. सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार हे स्वतः आवलमरी येथे जाऊन गावातील गावकऱ्यांची आस्थेने विचारपूस करून गावातील सर्व समस्या प्राधान्याने सोडवून देण्याची आश्वासन दिल्या ने आवलमरी येथील गावकऱ्यांनी. समाधान व्यक्त केले.