आपला विदर्भ

अहेरी पं.स.ला जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दिली आकस्मिक भेट

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

*अहेरी पंचायत समितीला आकस्मिक भेट **
जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची
अहेरी पंचायत समिती कार्यालयात आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष *अजयभाऊ कंकडलवार* यांनी अचानक भेट देवून विविध कामाची तपासणी केली.यावेळी घरकुल चे करार नामेची तपासणी करण्यात आली त्यात अभियंताचे नक़ली स्वाक्षरी कार्यालयचे कर्मचायांनी मारल्याचे निदर्शनास आले.
तसेच घरकुलचे पूर्ण बांधकाम करण्यात आलेल्या नागरिकाना त्वरित रक्कम देण्यात यावी.असे निर्देश दिले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ.सुरेखा आलाम,जि.प.सदस्या कु.सुनीता कुसानाके,पंचायत समिती सदस्य भास्कर तलांडे,राकेश पनेला, प.स.सदस्या सौ.गीताताई चालुरकर,प्रांजली शेबडकर,प.स.स.शारदा कोरेत,छायाताई पोरतेट,रायपुरचे सरपंच रामलू कुडमेथे,देवलमारीचे उपसरपंच जगनाथ मडावी,आलापल्ली ग्राम पंचायत सरपंच सौ.सुगंधा मडावी,श्रीनिवास राऊत,कार्तिक तोगम,प्रशांत गोडसेलवार,दिवाकर आलाम,आदि उपस्तीत होते.