आपला विदर्भ

जि.प.सदस्या आईलवार यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

विदर्भक्रांती न्युज नेटवर्क

सौ.सारिकाताई प्रवीण आईलवार यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन
एटापल्ली :- ग्रामपंचायत उडेरा अंतर्गत रेकणार येते दलीतवस्ती सुधार योजनेअंतर्गत सी.सी.रोड बांधकामास प्रारंभ करण्यात येत आहे.या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या सारिकाताई प्रवीण आईलवार यांच्या शुभ हस्ते पार पडले.
यावेळी प.स. उपसभापती नितेश नरोटे, सरपंच ग्रा.प.सरपंच अशोक अलामी, ग्रामविकास अधीकारी डी. एन. श्रीरामे, मणीकंठ गादेवार, पोलीस पाटील सैनू दोबा हिचामी, ग्रा.प.स.रमेश आतलामी, राणू गोटा, गोमजी पुंघाटी,विनोद हिचामी, चंद्रकांत उसेंडी, चंदू दुर्वा, बापुरेड्डी बिरमवार, रमेश हिचामी ,किशोर हिचामी, जोगा पुंघाटी, बाबलू पदा, डुंगा हिचामी, बरसू जोई, मुकेश पुंघाटी, मंगेश पुंघाटी, उपस्तीत होते. उडेरा ग्रामपंचायत अंतर्गत विकासात्मक कामे हाती घेण्यात आली असून जिल्हा परिषद प्रशासनस्तरावर निधी प्राप्त झाल्याने ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागात विकासकामांना वेग आलेला आहे.
या कामांतर्गत रेकणार येते सी.सी.रोड बांधकामास मंजुरी प्रधान करण्यात आली असून कामाला प्रारंभ झाला असून नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.