आपला विदर्भ

टेकडाताल्ला येथे बी.एस.एन.एल.ची मोबाईल टॉवर उभारा !

विदर्भक्रांती न्युज नेटवर्क

गडचिरोली..

सिरोंचा तालुक्यातील टेकडाताल्ला येथे बी एस एन एल ची मोबाईल टॉवर उभारण्याची मागणी येथील आविस चे युवा कार्यकर्ते साईकुमार मंदा यांनी आज गडचिरोली येथील दूरसंचार कार्यालयात विभागाचे जिल्हा प्रबंधक एम.ए. जीवने यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा निवेदन देऊन वरील मागणी केली आहे.

निवेदनात, टेकडाताल्ला या गावासह परिसरातील वीस गावातील मोबाईलधारक तेलंगणाच्या नेटवर्क वर अवलंबून राहावे लागत असून तेलंगणातील नेटवर्क जर बंद राहिल्यास वीस गावातील मोबाईल बंद पडतात व कोणाशीही संपर्क होत नाही ..अनेकदा रेंज कमी असतात त्यामुळे मोबाईलधारकांना कवरेजसाठी त्रास होतात .वीस गावात हजारो मोबाईल वापरणारे धारक असल्याने टेकडा ताल्ला गावात बी .एस. एन. एल .ची टॉवर उभारल्यास जनतेला सोय सुविधा उपलब्ध होणार आहे.