आपला विदर्भ

गोविंदपूर येथील रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

मूलचेरा
जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालावर यांच्या हस्ते मूलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रविंद्र निर्मल शाहा तर प्रमुख पाहुणे म्हणून हरीपद केशव पांडे ,डॉ रजित मंडल सर मा समीर अधिकारी, कमलेश भय्या पिंटू मोहूर्ले महानंद बिश्वास, अजय वडाल सुब्रत बाला, मिलन बिश्वास प्रकाश मधू मिथुन मंडल सह उपस्थित होते.

तर या भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २१००१/-रोख मा श्री अजय भाऊ कंकडालावर यांचे कडून देण्यात येणार आहे आणि द्वितीय पारितोषिक १५००१/-रोख मा श्री रविंद्र निर्मल शाहा जिल्हा परिषद सदस्य याचा कडून देण्यात येणार आहे व तृतीय पारितोषिक १०००१/-रोख मा हरीपद केशव पांडे यांचा कडून देण्यात येणार आहे.

या उदघाटन स्पर्धेला मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकते, क्रिकेट खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.