आपला विदर्भ

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रिडा स्पर्धा काळाची गरज ..माजी आमदार दिपक दादा आत्राम

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

युवकांच्या सार्वांगीन विकासासाठी क्रिडा स्पर्धा काळाची गरज
मा.आमदार दिपकदादा आत्राम यांचे प्रतिपादन

प्रभागातील युवकांनी समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रित करावे..
जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार

अहेरी:- सेव्हन स्टार क्रिकेट क्लब अहेरी द्वारा गांडली मोहल्ला येथे आज भव्य टेनिस बाल क्रिकेट सर्कल सामन्याची उदघाटन कार्यक्रम माजी आमदार दीपक दादा आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार सह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्तीतीत उदघाटन सोहळा पार पडला.

या प्रसंगी बोलतांना माजी आमदार दिपकदादा आत्राम,म्हणाले युवकांच्या शारीरिक, मानसीक व बोध्दीक विकास करण्यासाठी क्रिडा स्पर्धा आयोजन करणे काळाची गरज असून प्रत्येक खेळाळूनी खिलाडी वृत्तीने खेळावे आयोजकांनी केळीमय वातावरणात ही स्पर्धा पार पाडावी असे ही आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलतांना जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांनी बोललेे कि युवकांनी खेळाच्या माध्यमातून एकत्रित येवून युवकांनी प्रभागातील समस्याचे चर्चा करून जे काही समस्या असल्यास ते समस्या आम्हच्या पर्यंत पोहोचवावे मग आम्ही त्या समस्या वर तोडगा काढू

आज अहेरी राजनगरीत विविध समस्या आहेत मात्र राजेशाही व हूकूमशाहीमुळे नागरिक समस्याचे वाचा करायला तयार नाही होत आहे त्यामूळे युवकांनी तरी मनात भीती न बाळगता आम्हाच्यासमोर समस्या मांडावे सदर समस्याचे निराकरण करण्यास आम्ही तत्पर तयारआहो अशी ग्वाही दिली.
या रबरी बॉल क्रिकेट सामन्याच्या उदघाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी पंचायत समितीचे सभापती सुरेखाताई आलाम , सुनिता कुसनाके जि.प.सदस्या, प.स सदस्य भास्कर तलांडे प.स.सदस्या,गीताताई चालुरकर,सामाजिक कार्यकर्त्या सौ.लक्ष्मीकाकू कूळमेथे ,प्रसाद मद्दीवार,बाबुराव मूलकलवार ,तोटावार,कृष्णा बोम्मावार , शैलू मडावी,आदी मंचावर होते. क्रिकेट स्पर्धा यशस्वीतेसाठी मंडळचे युवक सारंग लेनगुरे,रोहित मूलकलवार,त्रीवेन्द आत्राम,वीक्की शिवरकर,व युवक ग्रामस्थ उपस्थित होते.