महाराष्ट्र

‘त्या’अश्लील शिवीगाळ प्रकरणाची अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी येथील तहसीलदार कार्यालयात येऊन महसूल कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ व बघून घेण्याची धमकी दिल्याची तक्रार करीत उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांना निलंबित करून कडक कारवाई करण्याची मागणी महसूल कर्मचाऱ्यांनी 3 नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन पाठवून केली होती.

या प्रकरणाची सखोल चौकशीत विलंब होत असल्याचे पाहून जिल्हयातील बारा तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत तहसिलदार कार्यालयासमोर निदर्शने करीत कामबंद आंदोलन करीत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी श्री नान्हे यांना दिले असून काल अप्पल जिल्हाधिकाऱ्यांनी सिरोंचा येथील तहसील कार्यालयात त्या अश्लील शिवीगाळ प्रकरण बाबत संबंधित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची बयान नोंदवून घेतले.

तर दुसरीकडे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांची या प्रकरणी पोलीस विभागाकडून हि चौकशी सुरू असल्याची माहिती असून सदर चौकशी अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक करीत असल्याची माहिती आहे.

एकंदरीत राजस्व व पोलीस विभागाकडून महसूल कर्मचाऱ्यांना दिलेल्या त्या अश्लील शिवीगाळ प्रकारनाची चौकशीला सुरुवात झाल्याने यात जर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव दोषी आढळले तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.