महाराष्ट्र

अखेर उ.वि.पो.अधिकारी राकेश जाधव यांची जिल्हा मुख्यालयात पद स्थापना

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांची महसूल कर्मचाऱ्यांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केल्याचे महसूल कर्मचाऱ्यांच्या आरोपावरून त्यांना सिरोंचा येथून हटवून गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयात पदस्थापना केले.

1 नोव्हेंबर ला पोलीस विभाग ,वनविभाग व महसूल कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून मेडिगड्डा सिंचन प्रकल्पासाठी अवैधपणे नेत असलेल्या अवैध गौनखनिजाची 10 डंपर पकडून कारवाई केले होते. 2 नोव्हेंबरला या करवाईवरून उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव व महसूल कर्मचाऱ्यामध्ये अश्लील शिवीगाळ प्रकरण घडला. 3 नोव्हेंबर ला येथील महसूल कर्मचाऱ्यांनी अश्लील शिवीगाळ प्रकरणी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे तहसीलदार मार्फत तक्रार केले.या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी महसूल कर्मचाऱ्यांची माफीही मागितली.तरीही प्रकरण शांत झाले नाही. प्रकरण जिल्ह्यात सर्वत्र पसरून महसूल कर्मचाऱ्यांच्या बेमुदत कामबंद आंदोलनाने जनतेला दाखल्यासाठी व विविध कामासाठी त्रास होत होता.याची दखल अखेर सरकारला घ्यावं लागला.

उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांची निलंबन व जिल्हा बाहेर बदली करण्यासाठी किमान आठ दिवसाची अवधी लागणार असल्याने राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाईची ग्वाही दिल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाला तूर्तास स्थगिती देत आज पासून पूर्ववत काम सुरू केले.

सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्यावर योग्य कार्यवाहीसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटना, विदर्भ पटवारी संघ,मंडळ अधिकारी संघटना, चतुर्थ श्रेणी संघटना सह कोतवाल संघटना गडचिरोली यांनी जिल्ह्यात बाराही तालुक्यात बेमुदत आंदोलन सुरू केले.या संघटनांची आंदोलनाची पोलीस व राजस्व विभाग व सरकारने दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांना जिल्हा मुख्यालयात पद स्थापना केले.