तेलंगणा

चंद्रपूर जिल्ह्यातील चिंतलधाबा येथील तिघांची कालेश्वर येथील गोदावरी नदीत बुडून मृत्यू ?

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा प्रतिनिधी

*चंद्रपूर जिल्हयातील चिंतलधाबा येथील तिघांची कालेश्वर येथील गोदावरी नदीत बुडून मृत्यू*

*सिरोंचा*…सिरोंचा शहरापासून आठ कि.मी. अंतरावरील तेलंगणातील कालेश्वर येथे गोदावरी नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील चिंतलधाबा येथील तिघांची पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी अंदाजे 3.30.वाजता कालेश्वर येथील वी.आय.पी. स्नानघाटावर घडली आहे.

चंद्रपूर जिल्हयातील चिंतलधाबा येथील अंदाजे अकरा जणांनी कालेश्वर दर्शनासाठी आले होते. दर्शन करण्याआधी पवित्र गोदावरी नदीत आंघोळ करण्यासाठी गेलेल्यांना नदीतील पाण्याची खोल पातळीची माहिती नसल्याने व आंघोळीसाठी खोल पाण्यात जाऊन आंघोळ करीत असताना यात तिघे खोल पाण्यात बुडाल्याने महाराष्ट्र पोलीस विभागात सेवेत असलेले अनिल दशरथ कुळमेथे वय 29 , रोहित राजेश्याम खडते वय 21, महेंद्र मारोती पोरतेट वय 24 या तिघांची मृत्यू झालेली आहे.
पवित्र कालेश्वर मुक्तेश्वर स्वामी दर्शनासाठी आज दुपारी चिंतलधाबा येथील दहा जण आले होते. दर्शनाआधी तिघांची पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याने या दुःखद घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यामुळे चिंतलधाबा गावावर शोककळा पसरलेलं आहे.

शोधमोहीम सुरू असून कालेश्वर पोलीस या घटनेची तपास करीत आहे.