आपला विदर्भ

अहेरी नगर पंचायतच्या पथदिवे खरेदीची चोकशी करून कारवाई करा..आर.टी.आय.कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांची मागणी

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

अहेरी न.प.च्या पथदिवे खरेदी ची चौकशी करून दोषींवर कारवाई करा आर टी आय कार्यकर्ता प्रशांत नामनवार यांची मागणी
अहेरी:-अहेरी नगर पंचायत तर्फे मागिल वर्षी अहेरी राजनगरीत रस्त्यांवर रोषणाई करण्यासाठी एल ई डी पथदिव्यांची खरेदी केली होती.सदर खरेदी ही नियमबाह्य झाली असून ही खरेदी ई टेंडर ने न करता तथा विना आर.सी. ने खरेदी करून. शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवून, फक्त कोटेशन मागवून थातुर मातुर पद्धतीने ही खरेदी उरकण्यात आली आहे.
सदर खरेदीसाठी कोटेशन मागणीची जाहिरात ही स्थानिक वृत्तपत्राच्या व्याख्येत बसणाऱ्या वृत्तपत्रात देणे बंधनकारक असतांना देखील अहेरी उपविभागात खप नसलेल्या व लोकांना माहीत नसलेल्या वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली. सदर खरेदीची बाब ही कोणाला कळू नये व मनमर्जीच्या आपल्या हितसंबंधातील लोकांनाच हे काम मिळावे यासाठी कट रचण्यात आला होता. सदर पथदिवे खरेदी करीत असताना नगर पंचायत चे मुख्याधिकारी डॉ कुलभूषण रामटेके यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून कुठल्याही शासन परिपत्रक, जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय निधीचे तुकडे पाडून मुद्दाम तीन लक्षपेक्षा कमी किमतीने कोटेशन मागवून टप्या टप्याने खरेदी करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.शासन निर्णयानुसार निधीचे तुकडे पाडता येत नाही.
तरी ह्या पथदिवे खरेदीची योग्य चौकशी करून दिनांक १० डिसेंबरच्या आधी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हाधिकारी,अप्पर जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अन्यथा १0 डिसेंबर ला सकाळी ११.०० वाजता पासून स्थानिक नगरपंचायत समोर आमरण उपोषणाला बसण्याच्या इशारा आर.टी.आय.कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांनी दिला आहे.