आपला विदर्भ

जि.प.सभापती जयसुधा जनगाम यांच्या नेतृत्वात शेकडो भूमिहीन नागरिकांची तहसील कार्यालयावर धडक

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

जि.प.सभापती जयसुधा जनगाम यांच्या नेतृत्वात शेकडो भूमिहीन नागरिकांची तहसिलदार कार्यालयावर दिली धडक*

बोगस अतिक्रमण नोंद रद्द करून तीन गावातील गरिबांना भूखंड वाटप करण्याची मागणी

सिरोंचा..तालुक्यातील पेंटींपाका ग्राम पंचायत अंतर्गत साझा क्रमांक 14 मधील वनजमीन,सरकारी आबादी व मिन्हाई गोचर या जमिनीवर उभी जंगल असतांना या जंगलव्याप्त जमिनीवर चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी संबंधितांना हाताशी धरून अतिक्रमण नोंद करून घेतले असून हि संपूर्ण अतिक्रमणाची प्रक्रियाच बोगस असून या अतिक्रमण जमीनीवरील बोगस नोंदीची योग्य चौकशी करून चौकशीअंती सर्व जमीन सरकार जमा करून सदर जमीन लंबडपल्ली, मुगापूर व मृदूकृष्णापूर या तीन गावातील गरीब व गरजूवंतांना वाटप करण्याची मागणी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनागम यांनी तीन गावातील शेकडो नागरिकांच्या उपस्तीतीत काल तहसीलदार सिरोंचा मार्फत आयुक्त नागपूर यांना पाठविलेल्या निवेदनातून केल्या आहे.
पेंटींपाका येथील साझा क्रमांक 14 मध्ये आज हि घनजंगल आहे.यात सरकारी आबादी ,मिन्हाई गोचर व वनजमीन असून उभ्या जंगलावर कोणत्याही प्रकारची अतिक्रमण नसतांना व कोणीही आज पर्यंत त्या जमिनीवर अतिक्रमण केले नसतांना अनेकांची नावाने अतिक्रमण पंजीत,गाव नकाशा व सातबाऱ्यावर बोगस पद्धतीने अतिक्रमण नोंद केल्याने यातील कागदावर बोगस अतिक्रमण प्रक्रिया राबविणाऱ्या सर्व संबंधितांची निष्पक्ष चौकशी करून त्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीहि निवेदनातून करण्यात आल्या.
पोचमपल्ली गावा जवळील गोदावरी नदीवर बांधण्यात येत असलेल्या मेडिगड्डा सिंचन प्रकल्पामुळे वरील तीनही गावे प्रभावित होणार असल्याने भविष्यात या तीनही गावांची पुनर्वसन करण्याची पाळी सरकारवर येणार असल्याने बोगस अतिक्रमनाची पूर्णजमीन सरकार जमा करून लांबडपल्ली,मुगापूर व मृदू कृष्णापुर या गावातील नागरिकांना भूखंड देण्याची मागणी करण्यात आल्या.

नायब तहसीलदार गोवर्धन गागापूरपूवार यांना निवेदन देतांना जि.प.सभापती जयसुधा जनागम यांच्या समवेत आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनागम, आविस सल्लागार रवी सल्लमवार, ग्राम पंचायत सदस्य सोमय्या गादे,सडवली जनागम सह लंबडपल्ली, मुगापूर व मृदूकृष्णापुर या तीनही गावातील बहुसंख्य नागरिक उपस्तीत होते.