आपला विदर्भ

सिरोंचा येथे उपजिल्हा रुग्णालयाची बांधकाम करण्याची शिवसेनेची मागणी

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क मागील पाच वर्षांपूर्वी सिरोंचासाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले पण अद्याप रुग्णालय बांधकामाची सुरुवात न केल्याने आणि येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक महत्वपूर्ण पदे रिक्त असल्याने रुग्णांवर योग्य उपचार न होत असल्याने परिणामी तालुक्यातील जनतेत आरोग्य विभागविषयी तीव्र नाराजी पसरले असून तात्काळ सिरोंचा येथे उपजिल्हा रुग्णालयाची बांधकाम करून येथील आरोग्य समस्या सोडविण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख अमित तिपट्टीवार व शिवसैनिकांनी नायब तहसीलदार एच.एस.सय्यद यांच्या मार्फतीने राज्याचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. निवेदनात, शेजारच्या राज्य तेलंगणात सरकारी दवाखान्यात तेथील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळत आहे. सिरोंचा तालुक्यातील नागरिकसुद्धा तेलंगणातील आरोग्य सेवेची लाभ घेत आहे. मात्र सिरोंचा तालुक्यातील नागरिक तेलंगणा सरकारच्या दवाखान्याच्या भरवशावर का राहायचं ? असे प्रश्न हि करण्यात आलं. नायब तहसीलदार सय्यद यांना निवेदन देतांना शिवसेना तालुका प्रमुख अमितकुमार तिपट्टीवार सह शहर प्रमुख साईकुमार तुम्मावार, दानिश कुरेशी,तुषार येंडे, रवी तोम्बरला, रवी मलमपल्ली,शाहरुख पठाण, प्रशांत येलपुला, श्याम गणारपु, राजू गणारापु, सिनू ओलोजी,प्रशांत तुलसिगारी, सतीश शेंडे, वेंकटेश नारम आदी शिवसैनिक उपस्तीत होते.