आपला विदर्भ

तालुका मुख्यालयात महिला बचत गटांना कार्यालय बांधकामासाठी भूखंड उपलब्ध करून द्या..जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांची मागणी

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

महिला बचत गटाला तालुका मुख्यालयी कार्यालय बांधकामासाठी जागा उपलब्ध करून द्या..जिल्हापरिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी

अहेरी तालुक्यातील महिला बचत गटाचे महिलांनी आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन तालुका मुख्यालयी सर्व महिला बचत गटांसाठी कार्यालय बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केल्या.

अहेरी तालुक्यात जवळपास बाराशे महिला बचत गट असून महिलांची मागणी रास्त असल्याने जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांनी वन परिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांच्यासोबत महिला बचत गटानां तालुका मुख्यालयी कार्यालय बांधकामासाठी वन जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केले.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांनी लवकरात लवकर जागेची पाहणी करून महिला बचत गटांना कार्यालय बांधकामासाठी वन जमीन उपलब्ध करून देण्याची आश्वासन दिले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्या सुनिता कुसनाके,महिला बचत गटाचे कल्पना गुरनुले, कविता कोटरंगे,जया गोंगले,लक्ष्मी कांबडे,प्रियंका गोवर्धन, विजय टेकूल,सुवर्ण मुजुमकर ममता वासकर विशाखा दुर्गे संगीता कलदे वटवी मॅडम प्रभाग महागाव नागेपल्ली,लक्ष्मण आत्राम प्रशांत गोडसेलवार दिवाकर आलाम राकेश सडमेक सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते