आपला विदर्भ

कोतवालांच्या कामबंद आंदोलनाला युवक काँग्रेसची पाठिंबा

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

कोतवाल संघटनेच्या आंदोलनास युवक कांग्रेस चा पाठींबा

सिरोंचा तालुक्यात विविध ठिकाणी तसेच राज्यभरात कार्यारत कोतवालांचे तहसिल कार्यलयचा समोर दि.26/11/2018 पासुन बेमुदत कामबंद आंदोलन मागिल 19 दिवसा पासुन सलग सुरू असुन तालुका कोतवाल संघटना अध्यक्ष आर.एम.चेदाम, मल्लेश जुट्टु यांची आज.दि.7/12/2018 रोजी तालुका युवक कांग्रेस चे पदाधिकारी आकाश परसा , तालुका अध्यक्ष कौसर खान , भारतीय माहिला अहेरी विधानसभा सचिव सौ.सुनिता परसा , मंगेश जाधव , लक्ष्मण मेकला , सौरभ परसा , आदी पदाधिकारीनी भेट देऊन चर्चा केली.
ह्या कोतवाल संघटना पद्धधिकारी यांनी चर्चा दरम्यान मागिल अनेक वर्षा पासुन कोतवाल पदावर कार्यरत असुनही कोतवालाना सहावा वेतन आयोगाच्या स्विकृत शिफारशीनुसार चतुर्थ श्रेणी का दर्जा देऊन 14968/- रू वेतन अहवाल कॅबिनेटमध्ये जो पर्यत मंजुर होत नहीं तो पर्यत महाराष्टाराज्य कोतवाल संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे उपस्थित युवक कांग्रेस पदधिकारी चर्चा दरम्यान सांगितले तसेच महागाईच्या काळात आजच्या 5000/- वेतनवर काम करणे परवड़त नसल्याने जो पर्यत कोतवाल संघटनेच्या मागण्या पूर्णता मंजुर होणार नाही तो पर्यत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती दिली असता संघटने च्या मागण्या शासनाने त्वरीत मान्य करावे हया करिता भारतीय युवक कांग्रेस पदाधिकारी जाहीर पाठींबा दर्शवत वळोप्रसंगी मागण्या पूर्ण करावे ह्या करिता मुख्यमंत्र्याशी व महसुल मंत्रीशी पत्रव्यवहार करणार असल्याचे हया वेळी भारतीय युवक कांग्रेस पदधिकारीनी जाहीर केले.