आपला विदर्भ

मोटलाटेकडा येथील आगग्रस्त कुटुंबाला माजी आमदार दिपक आत्राम यांच्या कडून आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा तालुका प्रतिनिधी

*मोटलाटेकडा येथील आगग्रस्त कुटुंबाला माजी आमदार दिपक आत्राम यांच्या कडून आर्थिक मदत*

*सिरोंचा*..तालुक्यातील मोटलाटेकडा येथील एका घराला अचानक आग लागल्याने या आगीत पूर्ण घर व किराणा दुकान जळून खाक झाली. यात घटनेने पूर्ण कुटुंब रस्त्यावर आल.
काल अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम हे सिरोंचा तालुक्यात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले असता त्यांना टेकडा मोटला येथील कार्यकर्त्यांनी या घटनेची माहिती दिली असता माजी आमदाराने टेकडा मोटला येथे जाऊन अशोक जोन्नाला या आगग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन अशोक जोन्नाला यांना आर्थिक मदत करून योग्य सहकार्य करण्याची आश्वासन दिले.
आगग्रस्त कुटुंबाला मदत करतांना माजी आमदार दिपक आत्राम यांच्या सोबत सिरोंचा पंचायत समितीचे माजी उपसभापती आकुला मल्लिकार्जुनराव, आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनागम,आविस सल्लागार रवी सल्लम,रमेश मेकला, रसुलभाई, संतोष येरकरी,मारोती गणापूरपू,सारली दुर्गम, वासू सपाट, रवी सुल्तान सह असरअली,सुंकरल्ली व मोटलाटेकडा येथील आविस कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.