आपला विदर्भ

अहेरी उपविभागातील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या.. माजी आमदार दिपक आत्राम यांची मागणी

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

*अहेरी उपविभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्या*
*धान खरेदी केंद्रामार्फत एकरी 25 क्विंटल धान खरेदी करण्यात यावी*

*माजी आमदार दिपक आत्राम यांची मागणी*

*सिरोंचा*..मागील चार दिवसांपासून अहेरी उपविभागातील सिरोंचा ,अहेरी, एटापल्ली, भामरागड व मूलचेरा या तालुक्यात ढगाळ वातावरण असून गुरुवारी पहाटे अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे धान ,कापूस , मिरची व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले असून नुकसान शतेकऱ्यांची पिकाचे पंचनामे करून हवालदिल झालेल्या व आर्थिक संकटात आलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी अहेरीचे माजी आमदार दिपक आत्राम यांनी सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
अहेरीचे माजी आमदार दिपक आत्राम हे बुधवारी व गुरुवारी असे सलग दोन दिवस सिरोंचा तालुक्यात जनसंपर्कदौऱ्यावर होते.यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतीत जाऊन धान व कापूस पिकाची पाहणी केले.पाहणी दरम्यान शेतांमध्ये कापलेल्या धानाचे कडपा पूर्ण भिजल्याचे व वेचून ठेवलेल्या कापूस हि भिजल्याचे दिसून आले.यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे त्यांना प्रत्यक्ष दिसून आले.त्यांनी धान खरेदी केंद्रावर जाऊनही शेतकऱ्यांशी चर्चा करून एकरी 25 क्विंटल धान खरेदीसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले.
गुरुवारी सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत यांची माजी आमदार दिपक आत्राम हे कार्यकर्त्यांसमवेत भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांबाबत चर्चा करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून देण्याबाबत व धान उत्पादक शेतकऱ्यांची धान खरेदी केंद्रावर कमीत कमी 25 क्विंटल धान खरेदी करण्यात यावी याबाबत तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविले.
सिरोंचाचे तहसीलदार जसवंत यांना निवेदन देतांना माजी आमदार दिपक आत्राम यांच्या सोबत गडचिरोली जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा जनगाम, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आकुला मल्लिकार्जुनराव,पंचायत समिती सदस्या शकुंतला झोडे, आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,आविस सल्लागार रवी सल्लम सह आविसचे कार्यकर्ते उपस्तीत होते.