आपला विदर्भ

क्रिडा संमेलनामुळे बालकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो..जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांचे प्रतिपादन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

क्रिडा संमेलनामुळे बालकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो
▪जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन
✍लहान मुलांच्या अंगात बालपणापासूनच काही ना काही सुप्त गूण असतात त्या गूण असे क्रिडा संमेलनाच्या मध्यमातूनच बाहेर येत असतात,तसेच या कला गुणांना आकार देवून खेळाडू घडवण्याच्या काम शिक्षक करत असतात.
तसेच विध्यार्थी शालेय शिक्षणासोबत खेळाकडे सुध्दा लक्ष देणे आवश्यक आहे.क्रिडा संमेलनमुळे विध्यार्थीच्या बौद्धिक व शारीरिक विकास सुध्दा होतो असे प्रतिपादन उदघाटनप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांनी केले.
पुढे बोलतांना म्हणाले या तीन दिवशीय क्रिडा संमेलनात सर्व शिक्षकानी व गावकर्यानी सहकार्य करून योग्य पध्दतीने पार पडवी अशी ही सूचना केल्या.
पंचायत समिती अहेरी अंतर्गत येत असलेल्या राजाराम-उमानूर केंद्रातील केंद्र संमेलन जिल्हा परिषद प्राथ. शाळा रायगटटा येथे आयोजित केंद्र स्तरीय शालेय बाल क्रिडा तथा कला संमेलनात उदघाटक म्हणून बोलत होते.
यावेळी पं.स.सदस्य भास्कर तलांडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अहेरी पंचायत समितीचे सभापती सौ.सुरेखा आलाम,होत्या तर विशेष अतिथि म्हणून जि.प.सदस्या कु.सुनीताताई कुसनाके, जि.प.सदस्य मा.अजय नैताम,उपसभापती मा.राकेश तलांडे,प.स.सदस्य श्री.भास्कर तलांडे,प.स.सदस्या सौ.शारदा कोरेत,तर प्रमुख पाहुणे म्हणून खाँदला ग्रा.प.सरपंचा सौ.शंकुतला कूड़मेथे,उपसरपंच श्री.गुरुदास पेंदाम,ग्रा.प.सदस्या सौ.वंदना आलोने,ग्रा.प.सदस्या सौ.शंकुतला दुर्गे,ग्रा.प.सदस्य श्री.सुधाकर आत्राम,राजारामचे माजी सरपंचा सौ.जोतीताई जुमानके,माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट खाँदलाचे माजी सरपंच सौ.लक्ष्मी श्रीरामवार,ग्राम पंचायत सदस्य श्री.नारायण कम्बगोनिवार, पोलीस पाटील श्री.सत्यम बंडरवार,श्री.व्येँकना कडर्लावार,श्री.राम अंबिलपवार,सुरेश पेंदाम,विलास चापले,संतोष श्रीरामवार, गटशिक्षणअधिकारी सौ,निर्मला वैद्य,आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या क्रिडा संमेलनात केंद्रातील 23 शाळांचा सहभाग आहे. या क्रीडा संमेलनाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री.सुनिल आईचवार , यांनी केले तर संचालन श्री.कोंडागुर्ले , यांनी केले. आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख देशपांडे यांनी मानले.
यावेळी दोन्ही केंद्रातील मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिक,व विध्यार्थी पालक व गावकरी उपस्थित होते.