आपला विदर्भ

आदिम जमाती योजनेअंतर्गत सिमेंट कांक्रिट रस्त्याची भूमिपूजन सोहळा थाटात

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

एटापल्ली

आदिम जमाती योजना अंतर्गत रस्त्याचे बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न*

माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न

एटापल्ली…. तालुक्यातील ताटीगुंडम ते येमली रस्ता बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.आदिम जमाती योजना अंतर्गत सदर रस्त्याचे काम मंजूर झाले.या भूमिपूजन प्रसंगी सहउदघाटक जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार होते.तसेच यावेळी सौ सारिकाताई आईलवार जिल्हा परिषद सदस्य,श्री नितेश नरोटे,नदुभाऊ मटामी,श्री प्रज्वल भाऊ नागुलवार,सौ राधा तलांडे सरपंच सौ पोवरी आत्राम ग्रा पं सदस्य,साधू गावडे माजी सरपंच,श्री बालाजी आत्राम माजी पं.स सदस्य, श्री वणु आत्राम पो पा,श्री घिसू आत्राम श्री देव आत्राम श्री कटिया गावडे सौ मुनीबाई दुर्गे श्री रमेश वैरागडे गणेश श्री गेडाम सह मोठ्या संख्येने उपस्थित होते.