आपला विदर्भ

फुले,शाहू व आंबेडकरांची विचारधारा बहुजनांच्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा.. माजी आमदार दिपक आत्राम यांचे प्रतिपादन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

*फुले ,शाहू ,आंबेडकरांची विचारधारा बहुजनांच्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा..माजी आमदार दिपक आत्राम यांचे प्रतिपादन*

*सिरोंचा*…आरक्षणाचे जनक व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले व राजर्षी शाहूमहाराज यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वस्व अर्पण करून या राज्याला व देशाला शोषित वंचित व पीडित घटकाला सामाजिक न्याय देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणले.त्यांनी देशाला व राज्याला नवी दिशा देण्याचे कार्य करवून देशात व बहुजन समाजात समानता घडवून आणले.या महापुरुषांची प्रेरणा सर्वांनी आत्मसात करून त्यांचे विचार बहुजन समाजातील शेवटच्या घटकाच्या घराघरापर्यंत पोहोचविण्याचे असे प्रतिपादन माजी आमदार दिपक आत्राम यांनी केले.

सिरोंचा येथे मिलिंद बहुउद्देशीय विकास मंडळ व नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने परिवर्तन भवन परिसरातील शाहूनगर येथे आयोजित दोन दिवसीय सामाजिक परिवर्तन दिनाच्या निमित्याने आयोजित फुले शाहू आंबेडकर वार्षिक महोत्सवात समारोपीय उदघाटन कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.
या वार्षिक महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार, जि. प.महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनागम, नालंदा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नानाजी सुनातकरी,भन्ते महानांम महाथेरो,उत्तम खैरे, सामाजिक विचारवंत नरेन गेडाम, अशोक गडकरी, सत्कारमूर्ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक कासारलावार, प्रा.मुन सर,आविस जेष्ठ नेते मंदा शंकर,आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम, सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लम, मिलिंदभाऊ आलोने, पंचायत समिती सदस्या शकुंतला जोडे, नगरसेवक नरेशभाऊ अलोने, जाफराबादचे उपसरपंच तिरुपती दुर्गम, भामरागडचे तिम्मा आदी मान्यवर उपस्तीत होते.
पुढे बोलतांना माजी आमदार दिपक आत्राम म्हणाले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना देऊन सर्व समाजाला समान अधिकार दिले असून त्यांना सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार समाजामध्ये दिले आहे.भारतीय राज्यघटनेचे आदर सर्वांनी करावी असेही त्यांनी म्हंटले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी थोर पुरुषांबद्दल आपले मनोगत यावेळी वार्षिक महोत्सवात मंचावरून व्यक्त केले.
समारोपीय उदघाटन सोहळ्याच्या प्रसंगी उपस्तीत मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून सुरुवात करण्यात आले.
या दोन दिवसीय वार्षिक महोत्सवात ध्वजारोहण,पेरियार ई. व्हि. रामस्वामी नायर यांच्या स्मृती निमित्य अभिवादन कार्यक्रम, समता सैनिक दलाकडून मार्गदर्शन, मोफत रोग निदान कार्यक्रम,कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कव्वाली मुकाबला, मधूबन शिक्षण, अंधश्रद्धा कार्यक्रम, शहरात रॅली काढून जनजागृती कार्यक्रम,विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रम सह अनेक समाजोपयोगी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या वार्षिक महोत्सवाची यशस्वी आयोजनासाठी मिलिंद बहुउद्देशीय विकास मंडळ व नालंदा चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
फुले शाहू आंबेडकर या वार्षिक महोत्सवाला तेलंगणा, छत्तीसगड व महाराष्ट्रातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.