आपला विदर्भ

सिरोंचा पोलीस विभागाकडून व्हॉलीबॉल स्पर्धा प्रारंभ

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा पोलीस स्टेशनच्या वतीने ग्रामीण व शहरी भागातील व्हॉलीबॉल खेळाडूसाठी भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन येथील क्रिडा मैदानावर करण्यात आला.

या स्पर्धेचे उदघाटन पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या हस्ते करण्यात आलं.

युवकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी पोलीस विभागाकडून व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी यावेळी सांगितले. या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन सोहळ्याला पोलीस विभागाचे अधिकारी सह मान्यवर मंडळी उपस्तीत होते.या स्पर्धेत तालुक्यातील अनेक संघ सहभागी झाले.