आपला विदर्भ

इतिहासकालीन सिरोंचा शहराची क्रिडा क्षेत्रात नावलौकिक करावे…माजी आमदार दिपक आत्राम

*इतिहास कालीन सिरोंचा शहराचे नाव क्रिडा क्षेत्रातही लौकिक करावे*
*माजी आमदार दिपक आत्राम*
*सिरोंचा*..सिरोंचा पुरातन काळापासूनच इतिहासकालीन शहर असून या शहराला आजही सर्वत्र अनन्य महत्व असून इथे कला, सामाजिक सांस्कृतिक ,संगीत व क्रिडा कार्यक्रमाचे संमेलने नेहमी मोठ्या थाटात आयोजन करीत असतात या शहराची सार्वभौमत्व संस्कृती व शहराला लाभलेलं पुरातन ऐतिहासिक वारसाची महत्व कायम अबाधित ठेवतच क्रिडा क्षेत्रातील खेळाडुनीं या इतिहासकालीन शहराची नाव क्रिडा क्षेत्रातही नावलौकीक करण्याचे आवाहन आविस नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक आत्राम यांनी केले.
सिरोंचा शहरातील एफ.सी.डी.चे भव्य मैदानावर सिरोंचा स्पोर्ट्स अकॅडमी कडून आयोजित टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचा उदघाटन सोहळ्याचे उदघाटक म्हणून ते बोलत होते.
या क्रिकेट सामना सोहळ्याचे अध्यक्षस्थानी आविस नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार हे होते .
प्रमुख अतिथी म्हणून जि. प.महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनगाम,अहेरी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, जिल्हा परिषद सदस्या सुनीता कुसनाके, पंचायत समिती सदस्या शकुंतला जोडे,पंचायत समितीचे माजी उपसभापती आकुला मल्लिकार्जुनराव, आविस जेष्ठ नेते मंदा शंकर,नगरसेवक नरेश अलोने,आय.बी.एन.वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी, पत्रकार नागभूषणंम चकिनारपवार,आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनागम,सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लम, दुर्गय्या कोठारी, सुधाकर पेद्दी, सोमय्या गादे, जाकीर नवाजीश अली, शेख इस्माईल,मोहनराव मेचीनेनी,संपतराव, श्याम बेज्जनीवार, मारोती गणपुरापू, ओंकार ताटीकोंडावार,रवी बॉंगोनो, सुरेश पोलोजी, संजू पेद्दपल्ली,शेख रसुलभाई,सलमान शेख, सोईल शेख, संतोष भीमकरी, संतोष पडाला, श्रीनिवास जानकी,रवी सुलतान, तिरुपती आदी उपस्तीत होते.
पुढे बोलतांना माजी आमदार आत्राम म्हणाले,माझे पाच वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात सिरोंचा शहरात अनेक विकासकामे केले असून येथील सामाजिक , सांस्कृतिक ,कला व क्रिडा क्षेत्रातील कलावंत व खेडाळू यांच्यातलं सुप्त गुणांना वाव मिळावे म्हणून आवश्यक सहकार्यहि केले भविष्यात आपण सिरोंचा शहराची सर्वांगीण विकासासाठी कटीबद्द असून या शहरातील व तालुक्यातील खेडाळूना नेहमी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन माजी आमदार आत्राम यांनी दिले.
यावेळी कार्यक्रमाचेअध्यक्ष जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी सामन्यात पंचांनी चुकीचे निर्णय देऊ नये योग्य निर्णय दिल्यास मंडळाचे चांगले नाव येईल मात्र चुकूनही पंचांनी चुकीचे निर्णय दिल्यास मंडळासोबत गावचे नावही सर्वदूर बदमान होईल याकडे आयोजकांनी लक्ष देण्याची आवाहन करीत आज जिल्ह्यात सर्वत्र आविस कडून क्रिकेट ,व्हालीबाल व कबड्डी सामन्यांचे आयोजन होत असून यामुळे क्रिडा क्षेत्रातील खेळाडूंची सुप्त गुणांना वाव मिळणार असल्याचे मार्गदर्शन केले.

यावेळी महेश तिवारी व आकुला मल्लिकार्जुनराव यांनी थोडक्यात बहुमूल्य विचार मांडले.
टेनिस बॉल क्रिकेट सामन्याची उदघाटन माजी आमदार दिपक आत्राम व जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार सह मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून फित कापून करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक रवी सल्लम तर संचालन व आभार शेख इस्माईल यांनी मानले.

या क्रिकेट सामन्याचे प्रथम बक्षिस 30 हजार रु. माजी आमदार दिपक आत्राम व आकुला मल्लिकार्जुन यांच्याकडून तर द्वितीय 20 हजार रु.जि.प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व अंतिम सामन्यात विजेता संघासाठी आकर्षक शिल्डसाठी 10 हजार रु.जि.प.सभापती जयसुधा जनगम यांच्याकडून तसेच अनेक वयक्तिक पुरस्कार आविस पदाधिकारी कडून ठेवण्यात आले.

या क्रिकेट सामन्यात छत्तीसगढ, तेलंगणातील व महाराष्ट्रातील 30 संघांनी सहभागी घेतले. उदघाटन सोहळ्याचा यशस्वी आयोजनासाठी सिरोंचा स्पोर्ट्स अकॅडमीचे रंजित पेद्दपल्ली,साई मंदा,नागेश दुग्याला, महेश पोक्कुरी, शाहरुख खान,रोहित तोकला सह आविस कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
काल सिरोंचा येथे एफ.सी.डी.मैदानावर पार पडलेल्या टेनिस बॉल क्रिकेट उदघाटन सोहळ्याला शहरातील क्रिकेट प्रेमी, खेडाळू व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.